प्रगत , प्रगतशील , प्रयत्नशील साप्ताहिक प्लान [pdf, excel sheet Download ]
प्रगत , प्रगतशील , प्रयत्नशील साप्ताहिक प्लान
प्रगत , प्रगतशील , प्रयत्नशील [Excel File]
प्रगत , प्रगतशील , प्रयत्नशील [PDF]
अध्यापन म्हणजे ‘शिकावयास प्रेरणा देणे’. शिक्षणाची व्याख्या आता अत्यंत व्यापक झाली आहे. अध्यापनाची व्याख्या, स्वरूप, अध्यापकाचे कार्य इ. विषयींच्या कल्पना प्राचीन काळापासून सतत बदलत आल्या आहेत. अर्थातच अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. ज्या संस्कारांनी विद्यार्थ्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकसित होते, त्या संस्काराला ‘शिक्षण’ हा शब्द लावतात. ज्ञानदानाच्या हेतूने माहितीचे पुंज विद्यार्थ्यांच्या हवाली करणे, संचित ज्ञान हेच काय ते ज्ञान व त्याचे रक्षण झाले पाहिजे, अशा कल्पना पूर्वी होत्या. उत्तरोत्तर या कल्पना बदलत गेल्या. यशस्वी अध्यापन म्हणजे विद्यार्थ्याला अधिक ज्ञान होणे आणि त्याची आकलनशक्ती वाढणे, काही नवीन शक्तिसामर्थ्य लाभल्याचा आनंद होणे आणि त्याच्या प्रतिसादातून नव्या अध्यापनाला गती मिळणे. संस्कारप्रदानाचे कार्य घरी, समाजात व शाळेत चालू असते; पण त्यात विशिष्ट पद्धत नसते व सहेतुक योजनाही नसते. हे ‘अनौपचारिक’ शिक्षण होय. पद्धतशीर व शिस्तबद्ध रीतीने संस्कार करण्यासाठी ‘शाळा’ या संस्थेची निर्मिती समाजाने केली .
No comments:
Post a Comment