आजचा लेख रामायणातुन मिळणाऱ्या धड्यांवर आधारित आहे.
तुम्ही आस्तिक, नास्तिक काहीही असलात तरी रामायणातुन मिळणाऱ्या ह्या धड्यांपासुन तुम्हाला एक चांगले मार्गदर्शन मिळेल.
वाईट संगतीचे परिणाम
आपल्या सर्वांना माहित आहे कि कैकयी प्रभू श्रीरामांना तिच्या मुला भरतपेक्षा जास्त प्रेम करायची. पण अचानक असे काय झाले की तिच्या मनात श्रीरामासाठी कपट निर्माण झाले? हा मंथराच्या संगतीचा परिणाम होता.
तात्पर्य :- ह्यातुन आपल्याला हे शिकायला मिळते की आपण नेहमी आपली संगत ही विचारपुर्वक निवडावी.
अहंकार
रावण हा अत्यंत ज्ञानी होता. त्याला मात देणे कोणाला ही शक्य नव्हते मात्र त्याचा स्वतःचा अहंकार त्याच्या पराभवाचे कारण ठरले.
तात्पर्य :- जर तुम्ही अहंकारी असाल तर तुमचा अहंकारच तुमच्यावर मात करेल.
आत्मविश्वास
रामायणात पाहायला मिळते कि प्रत्येक व्यक्ती हा आत्मविश्वासी होता. तो आत्मविश्वासच होता जो त्यांना कठिण प्रसंगांवर मात करायचे धैर्य देत होता.
तात्पर्य :- आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे.
ऐक्य आणि आदर
प्रभू श्रीराम हे प्रत्येकाशी आदराने वागले ज्यामुळे रावण सेनेने त्यांना एवढे सहकार्य केले तर रावणाच्या ‘मी’पणामुळे त्याचा स्वतःचा भाऊ त्याचा शत्रू होऊन बसला.
तात्पर्य :- ‘मी’पणामुळे आपलेही दुरावतात तर ऐक्य आणि एकमेकांप्रति आदर सन्मान दाखवला तर परकेही आपले होतात.
सोयीनुसार वागणे टाळा
प्रभू श्रीराम हे राजकुमार होते पण जेव्हा त्यांना राजवाडा सोडायची वेळ आली तेव्हा ते डगमगले नाहित. ते रानावनात राहिले, अनेक कठिण प्रसंगांना तोंड देत त्यांनी महान पराक्रम केले जे हजारो वर्षा नंतरही त्यांना स्मरणार्थ ठेवण्यास मदत करतात. जर त्यांनी महाल सोडण्यास नाकारले असते तर त्यांनी राज उपभोगले असते आणि वनवास त्यांना अवगत झाला नसता. पण वनवासच त्यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण भाग ठरला.
तात्पर्य :- महान गोष्टी कधी सोयीनुसार घडत नसतात, यश प्राप्तीसाठी त्याग महत्वाचा आहे.
आपल्या प्रत्येक धर्मग्रंथामध्ये, इतिहासामध्ये अनेक सुंदर आणि आदर्श जीवन जगण्याच्या गोष्टी, प्रसंग आहेत. आजकालच्या जगात नुसते धर्मांध न होता यातल्या शिकवणींचे आचरण करायला हवे.
No comments:
Post a Comment